| तळा | वार्ताहर |
तळा बाजारपेठेत तुळशी लग्नासाठी लागणारे साहित्य दाखल झाले असून, तालुक्यात सर्वत्र तुळशी विवाहाची लगबग सुरू झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आजपासून या विवाहाला प्रारंभ होत असून बाजारपेठही साहित्याने नटली आहे. नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडत आहे. तुळसीचे लग्न हा पूजोत्सव आहे. त्यात तुळस ही वधू, बाळकृष्ण हा वर, तर ऊस हा मामा समजला जातो. या सोहळ्यासाठी घराघरात लगभग पाहायला मिळत आहे. या विवाह सोहळ्यासाठी नागरिकांनी तुळशी वृंदावन सारवून, स्वच्छ करून सुशोभित करण्यास सुरवात केली आहे. त्याचप्रमाणे बाजारपेठेत ऊस, आवळे, चिंचा आतापासूनच विक्रीसाठी पाहायला मिळत आहेत. तुळशीची शोडषोपचार पूजा करण्यासाठी, सौभाग्य लेणे, नवीन साज, ओटी हे साहित्यदेखील पाहायला मिळत आहेत.