जिल्हा कामगार न्यायालय अलिबाग येथे चालू करा: वालेकर

| अलिबाग | वार्ताहर |

रायगड जिल्ह्याचे कामगार न्यायालय अलिबाग येथे कारखानदारी वाढल्यामुळे या जिल्ह्यासाठी वेगळे न्यायालय मंजूर करावे, अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांनी सरकारकडे केली आहे.

यापूर्वीही त्यांनी तत्कालीन राज्यकर्त्यांना केलेली आहे. त्या मागणीनुसार जिल्हा कामगार न्यायालय मंजूर झाले. तत्कालीन पालकमंत्री प्रभाकर मोरे यांनी सदर न्यायालय महाड येथे सुरू केले. पण सदर न्यायालय जिल्हा मुख्यालय अलिबाग येथे हलविण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांना कळताच त्यांनी न्यायालय अलिबाग येथे सुरू होण्यासाठी त्वरित जागा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती जिल्हाधिकारी रायगड यांना केली. जिल्हा कामगार न्यायालयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत पुरेशी जागा उपलब्ध करण्यात येईल, प्रमुख न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय रायगड-अलिबाग यांना कळविले असल्याचे लिहिले आहे. सदर न्यायालय अलिबाग येथे त्वरित सुरू होण्याबाबत कार्यवाही व्हावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या कडे वालेकर यांनी पुन्हा केली आहे. पण उत्तर दिले जात नाही.

Exit mobile version