तळीराम कर्मचार्‍यांना बडतर्फ करा

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग येथील प्रांत कार्यालयात संविधान दिनाचा पूर्व संध्येला सरकारी टेबलावर दारू पिणार्या कर्मचारीना सरकारी सेवेतून बडतर्फ करण्यासाठी व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश पाटील यांच्या सह 18 जणांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केले .
या उपोषण दरम्यान अलिबाग अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक हे त्या ठिकाणी येऊन सदर मागण्या मान्य करून घेण्यासाठी आम्ही पाठ पुरावा करू असे आश्‍वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली व त्यांच्या विनंतीला मान देऊन तात्पुरत्या स्वरूपात उपोषण मागे घेत आहोत व योग्य कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषणास बसन्याचा इशारा दिला
तसेच पाचवा इसम हा व्हिडीओ चित्रीकरणामध्ये स्पष्ट बसलेला दिसत असताना कारवाई का करत नाही असा सवाल केला आहे. पाचव्या इसमला जर नोकरी वरून बडतर्फ केला नाही तर निलेश पाटील यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे

Exit mobile version