गटारीच्या निमित्ताने लाखो रुपयांची उलाढाल

मासळी, मटणवर खवय्यांचा ताव

पाताळगंगा | प्रतिनिधी |
श्रावण महिनाचे आगमन काही तासांवर होत असल्याने त्यातच मासाहारी साठी रविवार येत असल्याने सकाळ पासूनंच मटण तसेच मासळी विक्रेत्यांकडे लाबंच लांब रांगा लागल्याला पहावयास मिळत आहे. गावठी कोंबडी तसेच बोकडाचे मास, मासळी हे घेण्यासाठी जणू अनेक ठिकाणी यात्रेसारखे स्वरुप प्राप्त झाले.जिकडे तिकडे गर्दीच पहावयास मिळत होते.

मराठी महिन्यातील श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो.विशेष करुन या महिन्यात पाले भाज्या सेवण अनेक जण करीत असतात.वर्षभर आपण मांसाहार करीत असल्यामुळे एक महिनातरी पाळावे या विचारांतून अनेक जण श्रावण महिना पाळत असतात.शिवाय हा महिना धार्मिक सणांचा असल्याने या महिन्यात अनेक सण येत असतात या सर्व बाबीचा विचार करुन मांसाहार वर्ज करावे आणी शरिरा बरोबर मन पवित्र राहवे.त्याच बरोबर जंगालात निर्माण होणारी विविध रानभाज्या या श्रावण महिन्याच्या निमित्ताने सेवण करावे.कारण या मध्ये विविध जीवनसत्त्व असतात यामुळे आपल्या शरिरामध्ये उर्जा आणी शरिर मजबूत राहण्यास मदत होते.

श्रावण प्रत्येक जण पाळत असतात.तसेच या वर्षी गटारी ही रविवार या दिवशी आल्यांने खवय्यांची मोठी पर्वणी निर्माण झाली आहे.यामुळे मिळेल तेथून मटण मच्छी घेवून पंचपक्कवांनाचा करण्यात आले. आपल्याला आता महिनाभर मांसाहार खाण्यांस मिळणार हे उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून तालुक्याच्या ठिकाणी गटारी साजरी करण्यात आली.

Exit mobile version