। रसायनी । वार्ताहर ।
तुषार तानाजी सिनलकर यांची इंडिया तायक्वांदो पूमसे समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तुषार स्वतः आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. त्याचबरोबर त्याने नुकत्याच मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.
यापूर्वी त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आशियाई तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून उत्कृष्टरित्या आपली भूमिका बजावली. याचबरोबर त्याने शालेय क्रीडा महासंघ भारत आयोजित राष्ट्रस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र तायक्वांदो संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी आपली भूमिका यशस्वीरित्या पार पाडून महाराष्ट्र संघाला 19 वर्षाखालील गटात द्वितीय क्रमांक पटकावून दिला. तसेच त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू तसेच राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक यांना मार्गदर्शन केले आहे.
पूमसे समितीच्या सदस्यपदी तुषार सिनलकर
