मिनी बस नदीत कोसळून बारा भाविक ठार; पाच जखमी

। उत्तराखंड । वृत्तसंस्था ।

रुद्रप्रयागमधील बद्रीनाथ महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेली मिनी बस नियंत्रण सुटल्याने नदीत कोसळली. त्यामुळे त्यात असलेल्या 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 5 जण जखमी झाले आहेत.

रुद्रप्रयाग इथल्या बद्रीनाथ महामार्गावरुन वेगाने जात असलेल्या मिनी बस ट्रॅव्हरलच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट अलकनंदा नदीत कोसळली. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांनी तसेच, पोलीस अधीक्षक डॉ. विशाखा भदाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, बचाव पथकाला पाचारण करण्यात आले असून मिनी बससह अपघातील जखमींना पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे.

जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र, या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.

Exit mobile version