मध्य प्रदेश :
महाराष्ट्राच्या एसटी बसला मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. मध्य प्रदेशातील धार येथे हा अपघात झाला आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने ही बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. जळगावच्या अंमळनेरकडे निघालेली ही बस पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात आलं आहे.
अपघातग्रस्त बस ही महाराष्ट्र एसटी मंडळाची होती. बस धार येथून अंमळनेरकडे निघाली होती. खालघाट परिसरात असताना एसटी बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती आहे. प्रशासनाकडून सध्या मृतांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.