| मुरूड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील असलेली गावे गोपाळवट, फणसवाडी, वाघीरपट्टी, मसाडी, कांटी, केळघर, वांडरखोंडा, साटलेवाडी, आराळी, खडकी, वांदरखोंड असी सुमारे दहा ते बारा गावांचा विज पुरवठा गेल्या सहा दिवसांपासून खंडित झाल्याने आज अखेर ग्रामस्थांनी निर्णय घेऊन रोहा महावितरण कार्यालयावर धडक दिली व उपविभागीय अभियंता वाघमोडे यांना धारेवर धरले आणि विज पुरवठा सुरळीत करण्याबाबत निवेदन दिले आहे
या अनेक दिवस सतत जाणार्या विजेमुळे मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. अखेर ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत झाला. बारा गावातील ग्रामस्थ एकवटले व 17 जुलै रोजी सभा घेऊन रोहा महावितरण कार्यालयावर धडक द्यायची व महावितरण अधिकार्यांना जाब विचारण्यासाठी 18 जुलै रोजी रोहा महावितरण कार्यालयात पोहोचले.
सहा सात दिवस विजपुरवठा खंडित झाल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अनेकांना आर्थिक, शैक्षणिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत यांची भरपाई द्यावी म्हणून महावितरण उपविभागीय अधिकारी वाघमोडे यांना धारेवर धरले व विज प्रवाह सुरू करण्यासाठी निवेदन दिले आहे.