पेण शहरात सव्वीस टन कचरा गोळा

| पेण । वार्ताहर ।
महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्म शताब्दी निमित्त पेण येथील डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी बुधवारी (ता .1) पेण शहरात महास्वछता अभियान राबविण्यात आले. या स्वछता अभियान मधून पेण शहरातून 25.98 कचरा गोळा केला. यावेळी पेण तालुक्यातील सोळा बैठकांतील 1302 श्री सदस्य उपस्थित होते.

प्रतिष्ठानच्या वतीने डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्म शताब्दी वर्षा निमित्त पेण शहरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये पेण तहसील,वनविभाग, पोलीस स्टेशन,तालुका दिवाणी न्यायालय, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका कार्यालय, सार्वजनिक बांधकाम कार्यालय, पेण स्टेशन परिसर, पेण स्मशान भूमी, रामवाडी बस स्थानक, रामवाडी एस. टी. विभागीय कार्यालय, आरटीओ कार्यालय आदी बरोबरच कुंभार आळी, म्हाडा कॉलनी, नंदीमाळ नाका, शिवाजी चौक, हनुमान मंदिर ते चावडी नाका,न्यायालय ते बस स्टँड, नगरपालिका ते चिंचपाडा रोड, प्रायव्हेट हायस्कूल ते शिवाजी चौक रोड, उत्कर्ष चावडी नाका, साई मंदिर, रेल्वे स्टेशन ते ए. टी. पाटील चौक,अंतोरे रोड , वैकुंठ धाम स्मशान भूमी ते आंबेडकर शाळा रस्ता, रामवाडी ते महामार्ग पोलीस चौकी, पेण एस.टी. स्टँड ते चावडीनाका आदि सर्व शहरात तसेच शासकीय कार्यालय परिसरात हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

Exit mobile version