23 वर्षीय तरुण बेपत्ता

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल तालुक्यातील रोडपाली येथील 23 वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, कळंबोली पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर समीन हुसेन (23) हा रोडपाली येथील रहिवासी असून, तो घरातून बाहेर पडला. त्यानंतर तो परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली. मात्र, त्याचा कोणताही ठावठिकाणा न लागल्याने अखेर कळंबोली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
बेपत्ता तरुणाची उंची सुमारे 5 फूट 8 इंच, बांधा मध्यम, रंग सावळा, चेहरा गोल, केस काळे व भुवया दाट आहेत. त्याच्या उजव्या हातावर इंग्रजीमध्ये सी अक्षराचा टॅटू असून, डाव्या हातावर कोरियन भाषेतील काही शब्द गोंदलेले आहेत. घरातून बाहेर पडताना त्याने पिवळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची फुल पॅन्ट परिधान केली होती. त्याला मराठी व हिंदी भाषा अवगत आहेत. या युवकाबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास किंवा तो कुठे आढळल्यास कळंबोली पोलीस ठाणे किंवा पो.हवा.मारुती पवार यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version