अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या

| मुंबई | प्रतिनिधी |

सावत्र वडिलांनी अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.7) मानखुर्द परिसरात घडली आहे. याबाबत मानखुर्द पोलिसांनी हत्या आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. मानखुर्दच्या अण्णाभाऊ साठे नगर परिसरात मुलगी, आई आणि सावत्र वडिलांसोबत राहात होती. गुरुवारी रात्री तिची आई घरकाम करण्यासाठी बाहेर गेली होती. त्याच वेळी सावत्र वडिलांनी या मुलीवर बलात्कार केला. मुलीची आई घरी परतल्यानंतर तिच्या ही बाब लक्षात येताच तिने तत्काळ मानखुर्द पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी हत्या आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Exit mobile version