| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल वाहतूक शाखा येथे नेमणूक असलेले पोलीस हवालदार युवराज येळे व पोलीस हवालदार अमीर स्सुल मुलाणी यांचा मोबाईल डिझेल चोरी करणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी हिसकावून पसार झाले होते. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक नगर समोरील ब्रिजवर, पनवेलच्या दिशेने येणाऱ्या वाहिनीवर, जे.एन.पी.टी. रोडवर, कर्तव्य बजावत असताना पोलीस हवालदार युवराज येळे व पोलीस हवालदार अमीर स्सुल मुलाणी हे जे.एन.पी.टी. रोडवर दोन्ही बाजुला अनधिकृतपणे उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करीत होते. यावेळी आरोपींपैकी एक आरोपी उभा असलेला मिक्सर वाहन या वाहनातून डिझेल काढत असताना त्यांनी पाहिल्यानंतर त्यास हटकले असता नमुद आरोपी पळून जाऊन मिक्सर वाहन शेजारीच उभी असलेली पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसत असताना यातील या दोघांनी त्यास पकडले असता त्याने या दोघांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करुन तसेच त्या दोघांना धक्का देऊन त्यांच्या ताब्यातील मोबाईल हातातून हिसकाला आणि नमुद पांढऱ्या रंगाच्या कारमधील सह आरोपी सोबत पळून गेले होते. याबाबत गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत होते.
पोलीस हवालदार परेश म्हात्रे यांना आरोपी साहिल लाड (23 ) रा. कर्जत याच्याबाबत माहिती मिळली असता आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने त्याचा सहकारी मुक्शशीर मुसव्वीर टोले, (27) रा. घाटकोपर याची माहिती दिली. या दोघांनी गुन्हा कबूल केला असून, मुख्य सहकारी जय पंडित याचा शोध पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे करीत आहेत.






