पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी रायगडचे दोन खेळाडू

। पनवेल । वार्ताहर |

पॉवरलिफ्टिंग इंडियाच्यावतीने बशीर बाग हैदराबाद येथील लालबहादूर शास्त्री इन डोअर स्टेडियमवर क्लासिक सीनियर पॉवरलिफ्टिंग स्पर्धा 8 ते 12 एप्रिल या कालावधीत होणार आहेत.

या स्पर्धेत 150 पेक्षा जास्त पुरुष आणि 100 पेक्षा जास्त महिला खेळाडू सहभागी होतील. महाराष्ट्राच्या संघात रायगडचे बबन बाबू झोरे (वाघेश्‍वर-कर्जत) 59 किलो वजनी गट आणि गणेश संजय तोटे (तक्का-पनवेल) 105 किलो वजनी गट यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबाबत बबन झोरे यांना विनोद येवले आणि गणेश तोटे यांना प्रमोद पवार व त्यांचे प्रशिक्षक विशाल मुळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

तसेच, पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगडच्यावतीने गिरीश वेदक, यशवंत मोकल, सचिन भालेराव, सुभाष टेंबे, संदीप पाटकर, राहुल गजरमल यांनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही खेळाडूंनी राज्य स्पर्धेत चांगली कामगिरी केली असल्यामुळे ते पदक विजेते होतील, असा विश्‍वास राष्ट्रीय पदक विजेते माधव पंडित यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version