अलिबागमध्ये दोन घरफोड्या, ५० हजारांचा ऐवज लंपास

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग परिसरात चोरी घरफोडीच्या घटना वाढत आहे. शुक्रवारी श्रीबाग तसेच म्हाडा कॉलनीत वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन घरफोडीचे प्रकार उघडकीस आले आहेत. श्रीबाग येथे कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे 50 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. तर म्हाडा कॉलनीत चोरीचा प्रयत्न झाला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

श्रीबागमधील बंगल्यातील रहिवाशी नागपूर येथे लग्न समारंभासाठी गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी डाव साधला. कडी कोयंडा तोडल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची माहिती संबंधितांना दिली. त्यानुसार माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी घरातील सुमारे 25 हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर दुसऱ्या घटनेत शहरातील म्हाडा कॉलनीत एका बंद घराचा कडी कोयंडा चोरट्यांनी तोडल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version