| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने मनसेने दोन उमेदवारांची नावे जाहीर करून आघाडी घेतली आहे. शिवडीमधून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर पंढरपूरमधील दिलीप धौत्रे यांना संधी देण्यात आली आहे. राज ठाकरे हे सध्या सोलापूर दौर्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करत आहेत. सोलापूरमध्ये असतानाच राज ठाकरे यांनी पंढरपूरमधून दिलीप धौत्रे यांची उमेदवारी जाहीर केली. दुसरीकडे, शिवडीमधून अपेक्षेप्रमाणे बाळा नांदगावरकर यांचे नाव समोर आले आहे.