दिगोडे मार्गावर दोन कंटेनरची समोरासमोर धडक

। चिरनेर । वार्ताहर ।
दिघोडे कणठेवली रस्त्यावरील एका भंगाराच्या दुकानासमोर बुधवारी पहाटे सुमारास मालाने भरलेल्या कंटेनर भरधाव वेगाने जात असताना दोन कंटेनर ट्रेलरची समोरासमोर धडक झाली यातील एक ट्रेलर भंगाराच्या दुकानात घुसला दुकानातील इस्मानी वेळीच पळ काढल्याने अनर्थ टळला मात्र या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला जखमींना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली उरण तालुक्यातील गव्हाण फाटा ते चिरनेर आणि खोपटा पूल ते चिरनेर या परिसरातील विविध रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात मालाची वाहतूक केली जाते काही वाहन चालक दारू, अमली पदार्थांची नशा करत असल्याने व क्लीनर नसल्याने रस्त्यावर अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ झाली आहे अशीच एक घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली नशेत असलेल्या वाहन चालकाचा ताबा सुटल्याने दिघोडे गावातील रस्त्यावर समोर दोन कंटेनर ट्रेलरची टक्कर झाली वाहनावरील वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक ट्रेलर भंगाराच्या दुकानात घुसला भंगाराच्या दुकानात असलेल्या इसमानी प्रसंगावधन राखून वेळीच बाहेर पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला मात्र या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अद्याप या प्रकरणाची गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे उरण पोलीसांकडून सांगण्यात आले

Exit mobile version