| रसायनी | वार्ताहर ।
रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाण्यात बुडून दोघांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. यात मोहोपाडा आळी आंबिवली येथील शालेय विद्यार्थी गणेश विनोद चव्हाण (14) हा मित्रांसोबत पाताळगंगा एमआयसीसी पंपहाऊस जवळील नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. तर जांभिवली धरणात एक अज्ञात इसमाचे मृत शरीर जांभिवली येथील धरणाच्या पाण्यात सडलेल्या अवस्थेत सापडले आहे. या इसमाचा देखील बुडून मृत्यु झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत रसायनी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शंनाखाली अधिक तपास सुरु आहे.
रयसायनीत पाण्यात बुडून दोघांचा मृत्यु
