| रसायनी | वार्ताहर |
नवी मुंबईतील तरुणांचा ग्रुप रसायनीतील सावळा देवळोली येथील ऊसराई तलावावर मौजमजा करण्यासाठी आला होता. तलावात पोहत असताना त्यांना तलावातील खोलीचा अंदाज न आल्याने यातील आकाश श्रीलाल मुरलीधर रा.सेक्टर 11, वाशी यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. यावेळी स्थानिक युवक व मित्रांनी आकाशला पाण्याबाहेर काढले. पण त्याचा मृत्यु झाला होता. ही घटना रविवारी (दि.26) रोजी दुपारच्या सुमारास घडली. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.