| ठाणे | प्रतिनिधी |
ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने एमडी या अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 कोटी 92 हजार रुपये किंमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांच्या आदेशानुसार पोलिसांकडून शहरात अमली पदार्थ विरोधात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव, ठाणे गुन्हे शाखा शोध 2 चे सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अमली विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे.
या कारवाईत पथकाने 1 कोटी 92 हजार रुपये किंमतीचा अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. तसेच सचिन सुभाष चव्हाण आणि रवि शामवीर डागुर यांच्यासह आणखी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







