अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या दोघांना अटक

। मुंबई । प्रतिनिधी ।

कोडीयन या अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या दोन सराईत आरोपीना शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून कोडीयन सिरपच्या 240 बाटल्या हस्तगत केल्या असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात दिवसेंदिवस अमली पदार्थांची तस्करी वाढत असून तस्करी रोखण्यासाठी परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे एक पथक मंगळवारी (दि. 04) रात्री परिसरात गस्त घालत होते. यावेळी येथील नारायण डेअरी परिसरात दुचाकीवरून जाणार्‍या दोघांचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांना पाहून दोघांनी पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून या दोघांना ताब्यात घेतले. रफिक सय्यद (45) आणि वहाबुल खान (28) अशी या अटक आरोपींची नावे असून दोघेही गोवंडी परिसरातील राहणारे आहेत. तसेच, त्यांच्या जवळील गोणीची पोलिसांनी तपासणी केली असता, त्यात कोडीयनच्या 240 बॉटल सापडल्या. त्यांची किमत 1 लाख 20 हजार रुपये इतकी आहे.

Exit mobile version