नागोठण्यात दोन चारचाकी गाड्या फोडल्या

कुटुंबियांच्या द्वेषापोटीच आमच्या गाड्यांचे नुकसान : शैलेश रावकर
। नागोठणे । महेश पवार ।
नागोठण्यातील वकील व सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. श्रीकांत रावकर व श्री जोगेश्‍वरी सहकारी पतसंस्था नागोठणेचे संचालक शैलेश रावकर यांच्या मालकीच्या हुंडाई क्रेटा (एमएच 06/बियु 7299) व मारुती सियाज (एमएच 06/ बियु 0860) या चारचाकी गाड्यांच्या समोरील काचा अज्ञातांकडून फोडण्यात आल्या आहेत.

अ‍ॅड. श्रीकांत रावकर व शैलेश रावकर यांनी श्री.जोगेश्‍वरी माता मंदिराजवळील डॉ.कुंटे यांच्या घरासमोर सोमवार दि.13 फेब्रुवारी रोजी रात्री नेहमी प्रमाणे केल्या होत्या. सोमवारी रात्री 12 ते सकाळी 5 वा.च्या. दरम्यान कुणीतरी अज्ञात व्यक्तीने गाड्यांच्या पुढील काचा मोठ्या दगडाने फोडून नुकसान केले आहे. याबाबत मारुती सियाज (एमएच 06/ बियु 0860) या गाडीचे मालक शैलेश रावकर यांना खबर मिळताच तात्काळ ज्या ठिकाणी गाड्या पार्क केल्या होत्या. त्या ठिकाणी शैलेश रावकर व श्रीकांत रावकर गेले असता त्यांना त्यांच्या गाड्यांचे नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ नागोठणे पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार दाखल केली. याबाबत पुढील तपास पो.ह.संदेश सानप हे पो.नि.राजन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

आमच्या दोन्ही गाड्या रोज रात्री डॉ.कुंटे यांच्या घरासमोर पार्किंग करत असतो त्याप्रमाणे सोमवारी रात्री आम्ही नेहमीप्रमाणे आमच्या गाड्या पार्किंग केल्या होत्या आणि या जागेवरच आमच्या गाड्यांसमवेत इतर 10 ते 12 गाड्यासुद्धा पार्किंग केलेल्या होत्या. परंतु सोमवारी रात्री आमच्या दोघा भावांच्याच गाड्यांचे कुणीतरी व्यक्तीने नुकसान केले. हे नुकसान रावकर कुटुंबियांच्या द्वेषापोटीच कुणीतरी केले असल्याचा आरोप करुन याचा नागोठणे पोलिसांना शोध घेऊन संबंधित दोषी व्यक्तींवर ती कारवाई करावी अशी मागणी शैलेश रावकर यांनी केली आहे.

Exit mobile version