। पनवेल । वार्ताहर ।
एमजीएम कॉलेजच्या एमडीएस या विभागासाठी अॅडमिशन देतो असे सांगून 10 लाख रुपये उकळणार्या दोघांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे.
इम्रान खान (29) व सागर बळीत (32) असे या दोघांची नावे आहेत. त्यांनी एमजीएम कॉलेजच्या एमडीएस या विभागासाठी अॅडमिशन करून देतो असे सांगून एका विद्यार्थ्याकडून 10 लाख रुपये उकळले. त्यांना बनावट लेटरहेड बनवून त्याद्वारे नियुक्तीपत्र तसेच अॅडमिशनचे पत्र दिले व त्यांची फसवणूक केली. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पालीस निरिक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक अभय कदम व त्यांच्या पथकाने या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या दोघाजणांनी अजून कोणाला अशा प्रकारे फसविले आहे का? तसेच त्यांच्याबरोबर एमजीएम कॉलेजमधील काही जणांचे साटेलोटे आहे का? याचा शोध पोलीस उपनिरीक्षक अभय कदम करीत आहेत.