दोन मुलींचा होरपळून मृत्यू

| छत्रपती संभाजीनगर | वृत्तसंस्था |

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. स्वत:ला पेटवून घेतलेल्या आईकडे धाव घेतलेल्या दोन मुलींचा होरपळून मृत्यू झाला आहे.

वैजापूर तालुक्यातील आंचलगाव येथे रविवारी (दि.24) कौटुंबिक वादातून एका महिलेने स्वत:ला पेटवून घेतले. पण, यावेळी महिलेच्या चिमुकल्या दोन मुली आगीत होरपळत असलेल्या आईकडे धावल्या. यावेळी पेटलेल्या आईसोबत आगीत चिमुकल्या दोघीही होरपळल्या. यात एका सात महिन्यांच्या चिमुकलीचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला, तर सहा वर्षाची दुसरी मुलगी कल्याणी गंभीररित्या जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. पत्नी आणि मुलींना वाचवण्यासाठी पतीनेही प्रयत्न केला. मात्र, या आगीत पतीही गंभीररित्या जखमी झाला. पती-पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ऐन होळी सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. 

Exit mobile version