इनोव्हा व ट्रकच्या अपघातात दोन जखमी

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल जवळील मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेच्या मुंबई लेनवर मंगळवारी पहाटे 5 च्या सुमारास इनोव्हा गाडी व अज्ञात ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
इनोव्हा गाडी क्रमांक टीएस 08 जीएच 8469 हि घेऊन चालक एस करुणाकर हे मुंबई दिशेकडे जात असताना अज्ञात ट्रकने त्यांच्या गाडीच्या डाव्याबाजूला ठोकर मारून तो पसार झाला या अपघातात गाडीतील अंजीया तुमु (वय 41, राहणार हैद्राबाद) व विजय मोहन वय 45, राहणार हैद्राबाद) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. या अपघातात गाडीचे सुद्धा नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे.

Exit mobile version