| कोलाड | प्रतिनिधी |
कोलाड-विळा मार्गावरील ढोकळेवाडी गावानाजिक बुधवारी (दि.22) रात्रीच्या सुमारास एका दुचाकीची ॲपे रिक्षाला जोरदार धडक बसली. या धडकेत दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
मळािलेल्या माहितीनुसार, बुधवारी ॲपे रिक्षा (एमएच-06-झेड-2812) ही विळा ते कोलाड असा प्रवास करीत होती. ही रिक्षा ढोकळेवाडी गावानजिक रुद्र हॉटेल समोर आली असता समोरून येणाऱ्या दुचाकी (एमएच-06-बीक्यु-4391) समोर अचानक कुत्रा आला आणि दुचाकीस्वाराने दुचाकी विरूद्धदिशेला वळवुन ॲपे रिक्षाला धडक दिली. या अपघातात लक्ष्मण वालेकर व मंगेश आरेकर हे जखमी झाले असुन त्यांना उपचारासाठी आंबेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले. अपघातचा अधिक तपास प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरिक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलीस एन.डी. महाडिक करीत आहेत.
दुचाकीची रिक्षाला धडक; दोघे जखमी
