। कोलाड । प्रतिनिधी ।
कोलाड-भिरा मार्गावर सुतारवाडी हद्दीत दुचाकी वाहन चालकाने इको कारला धडक दिली. यामध्ये तिघेजण जखमी झाले. ठाणे येथील रहिवासी असलेले एक कुटुंब इको कारने (एम.एच.05 इव्ही 5349) देवदर्शनासाठी निघाले होेते.
या मार्गावरुन प्रवास करताना कुडली बाजूकडून आलेल्या मोटारसायकलस्वाराने जोराची धडक दिली. यामध्ये मोटारसायकलस्वारासह इकोमधील दोघे जखमी झाले. या अपघाताची नोंद कोलाड पोलिसात करण्यात आली आहे.