आनंदवाडी अपघातात दोन ठार; दोन गंभीर जखमी

। तळा । वार्ताहर ।
तळा शहरातील आनंदवाडी येथे सोमवारी (दि. 4) सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान तळा-इंदापूर मार्गावर तळाकडून इंदापूरकडे जाणार्‍या इनोव्हा गाडी नंबर एम एच 46 डब्ल्यू 5177 चा अपघात झाला. चालक जयेंद्र पारावे (रा. बडदाड वाडी) यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने वावे फाट्याकडून जाणार्‍या आनंदवाडी अंगणवाडी सेविका प्रज्ञा प्रशांत सकपाळ (वय 32), सारिका संदीप जाधव (वय 5), रियांश गणेश पवार (वय 5), रिया गणेश पवार (वय 4) हे येत असता गाडी खाली सापडून प्रज्ञा व सारिका यांचा जागीच मृत्यू झाला. तर रियाश यास गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालय व रिया हिला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गाडी चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Exit mobile version