। अकोला । प्रतिनिधी ।
अकोल्यामध्ये एका भरधाव वाहनाची दुचाकीला धडक लागल्याने भीषण अपघात झाला आहे. यात दुचाकीवरील माय-लेकीचा मृत्यू झाला असून वडील आणि मुलगा जखमी झाले आहेत.
अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील व्याळाजवळ हा अपघात घडला आहे. अकोल्यातील हातरुण येथील उस्मान खान रहमान खान हे त्यांची पत्नी व दोन मुलांसह दुचाकीने अकोल्यातून वाडेगाव येथे जात होते. व्याळानजीक आले असता त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात उस्मान खान यांची पत्नी कशफ (28) यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगी अनाया फातेमा (9 महिने) हिचादेखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच, उस्मान खान (38) व त्यांचा मुलगा सदीम खान (5) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना अकोल्यातील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहेत.
या अपघातानंतर अज्ञात वाहनचालक फरार झाला असून याप्रकरणी पुढील तपास बाळापुर पोलीस करीत आहेत.






