केरळमध्ये दोन नेत्यांची निर्घृण हत्या

तिरुवनंतपूरम | वृत्तसंस्था |
केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यात विरोधी पक्ष भाजप आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया च्या दोन नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात तणावाचं वातावरण आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कलम 144 लावत जमावबंदी लागू केली आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या हत्यांचा निषेध केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री विजयन यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
चे राज्य सचिव के. एस. शान यांची शनिवारी संध्याकाळी हत्या करण्यात आली. ते घरी निघाले असताना त्यांची हत्या झाली. शान हे दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी एका कारमधून आलेल्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शान यांना कोच्चीतील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रात्री उशिरा दाखल करण्यात आलं. तिथे त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर हत्येचा आरोप केला आहे. तसंच त्यांनी हत्येचा कट रचल्याचं डऊझख म्हणणं आहे.

Exit mobile version