वडखळमधील ‘या’ दोन स्थानिकांना केले तडीपार…

। अलिबाग । वार्ताहर ।
वडखळमधील रहिवासी बालगोविंद रामभजन चव्हाण (वय-24), रा.जयकिसान विद्यामंदिर, वडखळ व आदर्श मधुसुदन भास्कर (वय 23) या दोघांना पोलिसांनी रायगड जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार केले आहे. आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी वडखळ पोलीस निरीक्षक यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली होती.

त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. या दोन्ही आरोपींनी परिसरात अनेक गुन्हे केले असून त्यांच्या कृत्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे व दहशतीचे वातावरण पसरले होते. भविष्यात समाजात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता त्यांना तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेेंडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस हवालदार परेश म्हात्रे आदींनी केली.

Exit mobile version