। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दि.10 ते 17 नोव्हेंबर असा कालवधी आहे. कर्जत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्या चार दिवसांत एकही अर्ज दाखल झालेला नव्हता. मात्र, आज सहाव्या दिवशी दोन अर्ज दाखल झाले आहेत. आता एकूण तीन अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती नगरपरिषद सूत्रांकडून मिळाली.
प्राप्त माहितीनुसार, 14 नोव्हेंबर रोजी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक दोनमधून संकेत जनार्दन भासे यांनी अर्ज दाखल केला होता. शनिवार, दि. 15 नोव्हेंबर रोजी जयदीप कृष्णा शिंदे अपक्ष प्रभाग क्रमांक एकमधून, तर गौरी भालचंद्र जोशी भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक सातमधून या दोघांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय जाधव यांच्याकडे सादर केले आहेत.







