। पनवेल । वार्ताहर ।
कळंबोलीतील सेक्टर 1-ई येथील करिष्मा सोसायटीच्या तळमजल्यावर असलेल्या अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये दोन दरोडेखोरांनी प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न सुरू केला. दरम्यान, एटीएममध्ये असलेल्या सुरक्षा यंत्रणेतील अलार्म वाजला. त्याची माहिती नवी मुंबई पोलीस कंट्रोल रूमला मिळताच त्यांनी त्वरित ही माहिती कळंबोली पोलीस ठाण्याला दिली. त्यावर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता एटीएमच्या गाळ्यात दोन चोरटे एटीएमचे शटर खाली करून एटीएममधील रक्कम काढत असल्याचे पोलिसांना आढळले. त्यावर पोलिसांनी या दोन्ही दरोडेखोरांना ताब्यात घेतले व त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.