| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वी केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचार्यांना खुशखबर दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी केंद्रीय सरकारी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली. या निर्णयामुळे महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्क्यांपर्यंत जाईल. यामुळे आठव्या वेतन आयोगापूर्वी कर्मचार्यांच्या पगारात वाढ होईल. याचा फायदा 68 लाखांहून अधिक कर्मचारी आणि सुमारे 42 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.