दोन खेळाडूंनी लावला संघ मालकांना चूना

एका धावेसाठी मोजावे लागले 2.4 कोटी रुपये

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

कोलकाताचा गोलंदाज मिचेल स्टार्क आजपर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासात सगळ्यात महागडा खेळाडू ठरला. कोलकाताने मिचेल स्टार्कला मिनी लिलावात 24.75 कोटी रुपयांना खरेदी केले होते. परंतु, सुरुवातीच्या सामन्यात मिचेल स्टार्कने चांगली गोलंदाजी केली नाही. यामुळे मिचेल स्टार्कला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला. मात्र, प्ले ऑफच्या फेरीत मिचेल स्टार्कने अचूक गोलंदाजी करत टीका करणार्‍यांना प्रत्युत्तर दिले.

यातच आयपीएलच्या हंगामात दोन खेळाडूंमुळे फ्रँचायझीचे मोठे नुकसान झाले आहे. कुमार कुशाग्राला आयपीएलच्या मिनी लिलावात दिल्ली कॅपिटल्सने 7.20 कोटी रुपयांना विकत घेतले. दिल्लीने त्याला एकूण तीन संधी दिल्या, ज्यात त्याने केवळ 3 धावा केल्या. अशाप्रकारे दिल्लीला कुशाग्रच्या प्रत्येक धावाची किंमत 2.4 कोटी रुपये मोजावी लागली. देवदत्त पडिक्कल गेल्या हंगामापर्यंत राजस्थानचा भाग होता. पण मिनी लिलावात त्याला लखनौच्या ताफ्यात दाखल झाला. तर, आवेश खान लखनौहून राजस्थानला आला. देवदत्त पडिक्कल फलंदाजी दमदार होईल या आशेने लखनौने त्याचा समावेश केला होता, पण तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. पडिक्कलने आयपीएलमध्ये 7 सामने खेळले, ज्यात त्याने केवळ 38 धावा केल्या. अशा प्रकारे पडिक्कलच्या एका रनसाठी लखनौला सुमारे 20 लाख रुपये मोजले.

Exit mobile version