राहत्या घरात सख्या बहीणींनी केली आत्महत्या

। पनवेल | प्रतिनिधी |
ऐरोलीमधील राहत्या घरात गळफास लावून सख्या बहीणींनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. लक्ष्मी पंत्री वय 33 आणि स्नेहा पंत्री वय 26 अशी त्यांची नावे आहेत. ऐरोली सेक्टर 10 मधील सागरदर्शन सोसायटीमध्ये ही घटना घडली. हॉल आणि बेडरूममध्ये पंख्याला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. कोरोना काळात आर्थिक संकटामुळे आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून अधिक तपास सुरु आहे.

Exit mobile version