। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहरातील सरेकर मध्ये राहणार्या एका वीस वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत महाड शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. अमेय मनोज भवूड वय 23 या तरुणाने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अमेय याने बारावीनंतर आय.टी.आय. शिक्षण घेऊन महाड औद्योगिक परिसरातील एका खाजगी कंपनीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करत होता, दुपारी घरी कोणी नसताना सदर तरुणाने आत्महत्या केली. ही घटना कुटुंबीयांना समजतात त्यांना धक्काच बसला महाड शहर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.