वीज ग्राहकांची दोन हजार प्रकरणे निकाली

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।

तालुकास्तरावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीतून कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित तसेच वीजचोरीची दाखलपूर्व व प्रलंबित अशी एक हजार 930 प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली. महावितरणच्या उपलब्ध सवलतीचा लाभ घेत संबंधित ग्राहकांनी दोन कोटी 15 लाख रुपयांचा भरणा केला आहे.

कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलल्या तसेच वीजचोरीची दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडवण्यासाठी लोक अदालतीत ठेवण्यात आली होती. त्यानुसार एक हजार 930 प्रकरणांमध्ये तडजोड होऊ शकली. त्यातून दोन कोटी 15 रुपयांची वसूली झाली. कल्याण मंडल एकअंतर्गत डोंबिवली, कल्याण पश्‍चिम व पूर्व विभागात 440 ग्राहकांनी 48 लाख 97 हजार रुपयांचा भरणा करून आपल्या प्रकरणांचा निपटारा केला.

लोकअदालत यशस्वी होण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणासह मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंते दीपक पाटील, दिलीप भोळे, राजेशसिंग चव्हाण, उपविधी अधिकारी दीपक जाधव, सहायक विधी अधिकारी सुहास बाराहाते, राजीव वामन व शिल्पा हन्नावार यांनी विशेष प्रयत्न केले.

Exit mobile version