। नेरळ । प्रतिनिधी ।
भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात पार्किंग केलेली दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली आहे. गणेश उघडे या आदिवासी तरुणाच्या दुचाकीची चोरी झाली असून याबाबत नेरळ पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.
कर्जत तालुक्यातील असल ग्रामपंचायतमधील चिंचवाडी येथे राहणारा गणेश शिवाजी उघडे गेली दोन वर्षे भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात आपली दुचाकी पार्किंग करतो. एनएस 160 या कंपनीची एमएच 46 सीपी 2361 या क्रमांकाची दुचाकी पार्क करून तो नेहमीप्रमाणे दादर या ठिकाणी खासगी कंपनीमध्ये नोकरीसाठी गेला होता. दिवसभरामध्ये आपले काम करून नेहमीप्रमाणे लोकल पकडून हा परत भिवपुरी स्टेशन येथे संध्याकाळी साडेपाच वाजता भिवपुरी रोड येथे पोहचला. मात्र नेहमीच्या जागेवर त्यांची दुचाकी आढळून आली नाही. त्यानंतर त्याने परिसरात दुचाकीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, कुठेही दुचाकी आढळून आली नाही. त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकी आढळून आली नाही. त्यानंतर गणेश उघडे या तरुणाने नेरळ पोलीस ठाणे येथे जाऊन आपली दुचाकी हरवल्याची तक्रार नोंदवली.







