बल्करच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

| पनवेल | प्रतिनिधी |

कळंबोली परिसरात भरधाव बल्करच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कळंबोली पोलिसांनी बल्कर चालकाविरोधात गुन्हा दाखल आहे. कमलेश सूरज यादव (26) याचा या अपघातात मृत्यू झाला तर शैलेश सहानी (22) हा जखमी झाला आहे. हे दोघेही कळंबोलीत राहण्यास असून, कळंबोली सर्कल येथील ए. आर. के. टायरसमोरून सिमेंट कंपनीच्या मुख्य रस्त्यावरून प्रवास करीत होते. याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या बल्करचालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक कमलेश गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला, तर शैलेश गंभीर जखमी झाला आहे.

Exit mobile version