वरसोली फाटयाजवळ अपघात
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील वरसोली फाटा येथील रस्त्यावर पडलेल्या केबल स्कुटीचा चाकड अडकल्याने खाली पडून दुचाकीस्वार जखमी झाला. त्याला उचाराकरीता कामोठे येथे नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले.
राजु आईलय्या चिंता वय 29 वर्षे अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 08 जुलै 2021 रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास मानी असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो ताब्यातील स्कुटी वरून मानीभुते ते अलिबाग येथे जात होता. वरसोली फाटा येथे ए वन स्टाईल दुकानाच्या बाजूला रोडवर पडलेली केबल त्याच्या दुचाकीच्या चाकास अडकून ते खाली पडून त्यांच्या डोक्यास डाव्या बाजूच्या हाताला खंद्याला व डाव्याच्या बरगडीस कपाळास व उजव्या हाताच्या पंजास दुखापत झाली. त्यामुळे त्यांना एमजी एम हॉस्पिटल कामोठे येथे उपचाराकरिता नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे बुधवार दि. 14 जुलै रोजी मोटार अपघात दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार सोनकर करीत आहे.