| अलिबाग | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील विद्यानगर येथे सोमवारी (दि.31) श्री स्वामी समर्थ प्रकट दिन व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट पालखी परिक्रमेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सहा वाजता पालखी परिक्रमेचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवर्य श्री नवनीतानंद महाराज स्थापित मठ सद्गुरु श्री स्वामी समर्थ सेवा ट्र्स्ट विद्यानगर, वरसोली येथे श्रीस्वामी समर्थ प्रकट दिन व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्यातर्फे पालखी परिक्रमा आयोजित केली आहे. 31 मार्च रोजी पहाटे 6 वाजता श्रींच्या मूर्ती व पादुकांवर अभिषके, सकाळी 10 ते 11 वाजता होमहवन, दुपारी 12 ते रात्री 10 दरम्यान महाप्रसाद, दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान अलिबाग एसटी बसस्थानक ते श्री स्वामी समर्थ वरसोली मठ मिरवणूक सोहळा होईल. सायंकाळी 5 ते रात्री 11 वाजण्याच्या दरम्यान पादुका व दर्शन सोहळा होणार आहे. रात्री 8 वाजता आरती होईल.