| सोगाव | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर फाटा येथे रमेश आत्माराम रोहेकर मु.खांब-रोहा (60) हे आपले साडू चंद्रकांत तळकर यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला दि.2 रोजी आले होते. यावेळी त्यांनी आपली दुचाकी (एमएच-06-बीटी-2794) सीबी शाईन होंडा कंपनीची 125 सीसी ग्रे रंगाची व निळा पट्टा असलेली, मागील नंबर प्लेटवर ‘श्री समर्थ कृपा’ व पुढे शो वर ‘श्री’ असे लिहिलेली दुचाकी चंद्रकांत तळकर यांच्या अंगणात उभी केली होती. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने दि.3 रोजी रात्री 01 ते दुपारी 3 वाजेच्या दरम्यान चोरी केली आहे. याबाबत अधिक तपास केला असता दुचाकी न मिळाल्याने रमेश रोहेकर यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतीत अधिक तपास अलिबाग पो.ह. किर्ती म्हात्रे करीत आहेत.