। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव नगरपंचायत हद्दीतील रामेश्वर बिल्डिंग बामणोली रोड माणगाव याठिकाणी पार्किंग करून ठेवलेली एक काळ्या रंगाची होंडा शाईन मोटार सायकल अज्ञात चोरट्याने चोरून तो पसार झाला आहे. याबाबतची फिर्याद स्वप्नील दत्तात्रेय लहाने(वय-32) रा.रामेश्वर बिल्डिंग बामणोली रड माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि ,घटनेतील अज्ञात आरोपी इसमाने फिर्यादी स्वप्नील लहाने हे राहत असलेल्या रामेश्वर बिल्डिंगच्या पार्किंगमधून फिर्यादी यांची मालकीची एक काळ्या रंगाची हिरो होंडा शाईन मोटारसायकल जुनी वापरती किंमत अंदाजे 14 हजार रुपये हि चोरून तो फरार झाला आहे. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि. नं. 164 /2022 भादवि कलम 379 प्रमाणे करण्यात येऊन अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आघाव यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस नाईक खिरीट हे करीत आहेत.