| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात येऊन मोटर सायकल चोरी करून धुमाकूळ घालणारी टोळी रायगड पोलिसांकडून गजाआड करण्यात आली. नेरळ पोलिसाची गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही धडाकेबाज कामगिरी करीत मोटरसायकल चोरी करून धुमाकूळ घालणारी टोळीचा नायनाट करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील तसेच मुरबाड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मोटार सायकल चोरी प्रकरणी नोंद करण्यात आली होती.
तक्रारदार यांची सुझुकी कंपनीची एक्सेस 125 मॉडेलची स्कूटी नंबर एम एच 46 सी क्यू 7406 ही गाडी नेरळ बाजारपेठ अमन मटन शॉप येथे पार्किंग करून ठेवली असता, अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नेरळ-मुरबाड परिसरातील मोटरसायकल चोरी करून धुमाकूळ घालणारे टोळी रायगड पोलिसांकडून गजाआड करण्यात आली. या कारवाईमुळे रायगड पोलिसांचे कौतुक करण्यात आले आहे. नेरळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने गुन्ह्यातील अज्ञात आरोपी हे म्हसा तालुका मुरबाड जिल्हा ठाणे ग्रामीण येथील राहणार असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सापळा रचून चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यामध्ये आरोपी करण शिनगारे, सुजल जाधव, दोन विधीसंघर्षित बालक यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींंना पोलीस कोठडी मंजूर करून घेतल्यानंतर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपींनी नेरळ बाजारपेठ, पोई गाव आणि पाटगाव या तीन ठिकाणावरून तीन मोटरसायकल चोरी केल्या असल्याची कबुली दिली आहे. आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार खात्री केली आणि गुन्ह्याची उकल केली. अटक आरोपींनी नेरळ पोलीस ठाणे, मुरबाड पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेल्या एकूण तीन मोटरसायकल असा 91 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत राहुल गायकवाड, नेरळ पोलीस ठाणे सह पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुशील काजलेकर, पोलीस हवालदार वाघमारे, पोलीस शिपाई केकाण, पोलीस शिपाई बेंद्रे, पोलीस शिपाई वांगनेकर या पथकाकडून कारवाई करण्यात आली.
दुचाकी चोरी करणारी टोळी गजाआड
