। पनवेल । वार्ताहर ।
नवीन पनवेल येथील आदई सर्कल पुढे बालाजी संपत्ती फिक्स पॉईंट येथे वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार अमीर मुलाणी हे आपले कर्तव्य बजावित होते. त्यावेळी एक दुचाकीस्वार हेल्मेट परिधान न करता वाहन चालवित असल्यामुळे त्याच्यावर मुलाणी यांच्याकडून कारवाई करण्यात आली. त्यावेळी त्या दुचाकीस्वार चालवित असलेल्या गाडीच्या अधिक माहितीमध्ये ही गाडी चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत मुलाणी यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा अमोल पाटील, म्हात्रे, महेश पाटील, विशाल दुधे, वायकर, नितीन वाघमारे, पोना देशमुख, मिथुन भोसले, पोशि कराड आदींच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन कोप्रोली येथील आरोपी राहुल कांबळे (24) याला ताब्यात घेतले आहे.