दुचाकींनी व्यापला रहदारीचा रस्ता

। नेरळ । प्रतिनिधी ।

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील कर्जत दिशेकडील शेलू स्थानकातून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्या प्रवाशांकडून उपनगरीय प्रवास करताना घरातून आणल्या जाणार्‍या दुचाकी यांनी रेल्वे स्टेशनकडे येणारा रस्ता व्यापला आहे. दुचाकी दाटीवाटीने उभ्या करण्यात येत असल्याने चालणार्‍या प्रवाशांना वाट काढणे कठीण होऊन बसले आहे.

शेलू स्थानकातून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या वाढली आहे.शेलू स्थानकातून लोकलने प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या जशी वाढली आहे तसे या भागातील वाहनांची वर्दळ देखील वाढली आहे.मात्र त्यामुळे स्थानकात प्रवाशांच्या वर्दळीमुळे ओसंडून वाहत असतात.शेलू रेल्वे स्थानकातून प्रवास करणारे बहुसंख्य प्रवासी हे पूर्व भागात गावाकडील उभ्या राहिलेल्या वसाहतीमध्ये राहणारे आहेत. त्यामुळे त्या भागातून स्थानकात येणारे दोन्ही रस्ते प्रवाशांच्या वर्दळीमुळे सकाळच्या वेळी भरलेले असतात.

तेच रस्ते मागील काही महिन्यापासून प्रवाशी सोबत घेऊन येत असलेल्या वाहनांच्या वर्दळीमुळे भरून जाऊ लागले आहेत. शेलू गावातून स्टेशनकडे येणार आणि तेथील वसाहतीच्या मागील बाजूस असलेला रस्ता हा पूर्णपणे वाहनांच्या वर्दळीमुळे चालण्यास बंद झाले आहेत. दुचाकी वाहने अशी वेडीवाकडी लावण्यात येत आहेत. त्यामुळे स्थानकात येणार्‍या पादचारी यांना चालणे कठीण होऊन बसले आहे. दुसरीकडे या दुचाकींमुळे रेल्वे स्टेशन वर येणारे दोन्ही रस्ते हे कोणत्याही चारचाकी वाहने यांच्यासाठी बंद झाले आहेत.त्यामुळे एखाद्या रुग्णाला स्थानकातून नेण्यासाठी रुग्णवाहिका आली तर त्या रुग्णवाहिकेला स्थानकापर्यंत येण्यास रस्ता शिल्लक नाही. दुसरीकडे या ठिकाणी प्रवाशांच्या वाहनांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नाही आणि पार्किंग देखील नाही. अशा स्थितीत मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवाशांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करावी अशी मागणी पुढे येत आहे.

Exit mobile version