अमली पदार्थाची तस्करी; दोन महिलांना अटक

| नागपूर | प्रतिनिधी |

चंद्रपूर शहर पोलिसांनी अमली पदार्थ विक्रीप्रकरणी दोन महिला आरोपींना अटक केली आहे. तसेच, त्यांच्याकडील गांजासदृश अमली पदार्थ व विक्रीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे. मुस्कान खैरे (33), पुष्पा बानलवार (55) अशी आरोपी महिलांची नावे असून दोघीही शहरातील भिवापूर परिसरात राहतात. घरात टाकलेल्या धाडीत फुले, बिया, देठे, असे गांजासदृश 1 किलो 157 ग्रॅम अमली पदार्थ आढळून आले. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून दोन्ही महिलांवर गुन्हा दाखल करीत अटक केली. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

Exit mobile version