| पेण | प्रतिनिधी |
दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रावे गावातील मिनल पाटील (25) व चैताली मोकल (27) या दोघी बेपत्ता झाल्या आहेत. त्यातील मिनल पाटील ही हरविल्याची तक्रार तिचे पत्नी किरण पाटील यांनी दादर सागरी पोलीस ठाण्यात 24 डिसेंबर रोजी दिली आहे. मिनलची उंची 4 फुट 5 इंच असून केस काळे लांब, नाक सरळ, कानात सोन्याची कुडी, डोळे बारीक काळे, उजव्या हातावर किरण नाव गोंदविलेले, अंगात पिवळ्या रंगाचा कुर्ता व लेगीज, पायात चप्पल असे वर्णन आहे. तसेच, चैताली मोकल हरविल्याची तक्रार तिचा भाऊ विशाल पाटील याने 19 नोव्हेंबर रोजी दादर सागरी पोलीस ठाण्यात दिली आहे. चैताली रंगाने सावळी असून उंची 4 फुट 5 इंच, अंगाने मध्यम, कानात सोन्याची रिंग, गळ्यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, पायात साधी चप्पल, अंगात नेसून निळसर रंगाचा फुलांचा ड्र ेस, डाव्या हातावर इंग्रजीमध्ये किरण असे नाव गोंदवलेले, कपाळावर जुनी टाके पडलेली जखम असून सोबत सॅमसंग कंपनीचा मोबाईल आहे. या वर्णनांच्या दोन्ही महिला कुणाला अढळल्यास त्यांनी तातडीने दादर सागरी पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.







