| रोहा | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील चणेरा विभागातील तलवडे व चणेरा गावातून दोन तरुणी बेपत्ता झाल्याची घटना नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात घडली असून, या बेपत्ता तरुणी अद्याप घरी न परतल्याने घरातील मंडळींनी रोहा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे.
पूर्वा शैलेश साळवी (20, रा. चणेरा, ता. रोहा ) ही तरुणी 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास चणेरा गावातून मुरुड येथे राहणार्या मामाच्या गावाला जाते असे सांगून घरातून निघून गेली आहे. ती अद्याप मामाच्या घरी पोहोचली नाही. याविषयी तरुणीची आई लैला शैलाश साळवी यांनी पोलिसांत मिसिंग तक्रार दाखल केली आहे. तर दुसर्या घटनेत चणेरा भागातील तळवडे येथील मानसी विनायक शिगवन (23) ही दि. 4 नोव्हेंबर रोजी 2.30 वा. सुमारास मुंबई पार्ले येथे जाण्यास निघाली. रोहा रेल्वे स्थानकातून रोहा दिवा पॅसेंजर गाडीत बसून गेली ती नियोजित ठिकाणी रवाना झाली असता अद्याप न पोहोचल्याने चुलत बहीण शुभांगी गणेश बाकाडे यांनी तक्रार दिली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. नरेश मोरे पुढील तपास करीत आहेत.