दुचाकी अपघातात दोन तरुणांचा मृत्यू


| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील टाकवे गावासमोर टेम्पो आणि हिरो मोटारसायकल यांची जोराची धडक होऊन दोघे युवक ठार झाले. मृत दोघेही सावळे गावातील रहिवासी आहेत. ही दुर्घटना शुक्रवारी (दि.30) रात्री घडली.

सुझुकी कंपनीचा छोटा टेम्पोचालक कडाव कडून कशेळेकडे जात होता. त्यावेळी कशेळेकडे जाणारी दुचाकी त्या टेम्पोवर धडकून त्यात मोटारसायकल चालक तानाजी धुळे आणि दीपक धुळे हे गंभीर जखमी झाले. मात्र काही वेळाने त्या दोघांचा मृत्यू झाला. अपघाताची कोणतीही माहिती संबंधित टेम्पो चालक याने पोलिसांना न देता पळ काढला. त्यामुळे स्थानिक संतप्त झाले होते. पोलिसांनी दुचाकीचे नुकसान केल्याप्रकरणी आणि अपघाताची खबर न देता अपघातग्रस्त टेम्पो तेथेच सोडून पळून गेल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version